सक्षम भारत स्पोर्ट वार्ता
ता. 01 : GT वर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफी जिंकली. अहमदाबादच्या Narendra Modi Stadium मध्ये झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 75 धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करत GT ने 20 षटकांत 155/8 धावा केल्या. GT कडून मधल्या फळीत काही चांगल्या भागीदाऱ्या झाल्या, मात्र RCB च्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेत गुजरातला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.
156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने जबाबदारीने फलंदाजी केली. त्याने 42 चेंडूत नाबाद 75 धावा ठोकत RCB ला 18 षटकांत 161/5 पर्यंत पोहोचवले. शेवटी विराटने विजयी षटकार मारत RCB चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला.
या विजयासह RCB ने सलग दुसरे IPL विजेतेपद पटकावले. विराट कोहलीला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.












