सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

भाजप नागपूर जिल्हा (ग्रामीण) रामटेक दोन दिवसीय प्रशिक्षणवर्ग संपन्न २७६ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सहभाग

भाजप नागपूर जिल्हा (ग्रामीण) रामटेक दोन दिवसीय प्रशिक्षणवर्गाचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावणकुळे यांचा उपस्थित समारोप

सक्षम भारत वार्ता
कडमेश्वर, ता. ३१ : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा (ग्रामीण) च्या वतीने जिल्ह्यातील कळमेश्वर येथील नील फॉर्म नांदीखेडा येथे आयोजित केले होते. या प्रशिक्षण वर्गात कार्यकर्ता विकास, कार्यकर्त्यांचे वर्तन, आपल्या सरकारची कामगिरी व संघटनेची भूमिका,कार्यविस्तार,SIR, जनगणना, पदवीधर, राजकीय आव्हाने, बूथ व्यवस्थापन, मन की बात, सोशल मीडिया व विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बावनकुळे

दोन दिवसांच्या या कालावधीत विविध विषयांवर सखोल चिंतन करून भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि उद्दिष्टे सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे कशी पोहोचवता येतील,याची रणनीती आखली गेली. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितले पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेल्या अंत्योदयाच्या विचाराने प्रेरित होऊन जनतेच्या सेवेसाठी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत म्हणाले की,”भाजप हा संघटन आधारित पक्ष आहे,संघटन हे कार्यकर्ता आधारित आहे तर हा कार्यकर्ता नीती आधारित आहे.कार्यकर्त्या मुळे संघटन तर संघटन मुळे पक्ष मजबूत होतो” भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची विचारधारा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे तत्वज्ञान आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे,हा या वर्गाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रशिक्षण वर्गात जिल्हा (काटोल) अध्यक्ष मनोहर कुंभा, माजी आ. टेकचंद सावरकरजी, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी जी, माजी आ. अशोक मानकर जी, माजी आ. सुधीर पारवे, जिल्हा महामंत्री अनिल निधान, अजय बोढारे, राहुल किरपान, शुभांगीताई गायधने, रिंकेश चवरे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीजी पोतदार, भाजप महिला आघाडी अध्यक्षा डॉ प्रीतीताई मानमोडे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे, भाजप माजी जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये, पालकमंत्री कार्यालय समन्वयक किशोर रेवतकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, आस्तीक साहारे, कामठी नगरपालिकाचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल, येरखेडा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजकिरण बर्वे, मौदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, उमरेड नगरपालिकांच्या नगराध्यक्षा प्रजक्ताताई कारू, कन्हान नगरपरिषदचे नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, बेसा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा कीर्तीताई बडोले, बिडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष वीरू जामगडे, कांद्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुजित पाणनतावणे, बहादुरा नगरपंचायत नगराध्यक्षा प्रतीक्षाताई खंदाडे, प्रमोद घरडे, मंगेश यादव, सचिन घोडमारे, चंद्रशेखर राऊत, बाळू घोडमारे, राकेश काळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाचे संचालन महामंत्री राहुल किरपान यांनी केले.

Leave a Comment

Read More