सक्षम भारत वार्ता
बहादुरा, ता.२३ जुलै : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त अभिनंदन बहुद्देशीय संस्था व भाजपा वैद्यकीय आघाडी, हुडकेश्वर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बहादुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 35 नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदान शिबिराच्या प्रसंगी नगराध्यक्षा प्रतीक्षा खंदाडे, उपाध्यक्षा पुष्पा गायधने, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखूदे, गटनेते नितीन शेळके, सभापती नरेंद्र नांदुरकर, सभापती बालू घोडमारे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. अवध द्विवेदी, रिलायबल हॉस्पिटल चे संचालक डॉ. सचिन जिभकाटे, नगरसेवक डॉ. देवेंद्र बेलखोडे, एजाज घानिवाला तसेच अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष राम कावडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे उपस्थितांनी कौतुक केले.












