सक्षम भारत वार्ता
बिडगांव, ता.२४ : डॉ. राजीव पोतदार (आमदार, कामठी विधानसभा) यांनी नगरपंचायत बिडगाव-तरोडी खुर्द येथे भेट देऊन विविध विकासकामांचा व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीत स्वच्छता, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग तसेच SIR मोहिमेचा आढावा घेण्यात आला. आमदारांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच नगरपंचायतीकडे जिल्हा परिषद शाळा हस्तांतरणाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
नगराध्यक्षांनी नगरपंचायतीसमोरील विविध समस्या मांडल्या. मार्गदर्शन करताना आमदार डॉ. पोतदार यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. त्यांनी नगरपंचायतीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष वीरू जामगडे, मुख्याधिकारी विनायक घुगे, उपाध्यक्ष तथा स्वच्छता सभापती निकेश कातुरे, पाणीपुरवठा सभापती प्रियाताई मल्लेवार, शिक्षण सभापती प्रीतम बोकडे, महिला व बालकल्याण सभापती भारतीताई देवगडे, सर्व नगरसेवक,नगरसेविका अधिकारी व कर्मचारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनिल निधान, रमेश चिकटे, यावलकर व आशिष मल्लेवार उपस्थित होते.












