सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण; रुग्णालयात ज्यूस पिऊन अनशनाची सांगता

सक्षम भारत वार्ता
नवी दिल्ली | प्रतिनिधी | सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांच्या आमरण उपोषणानंतर अखेर आपले उपोषण मागे घेतले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुरू केलेले हे उपोषण त्यांच्या प्रकृती खालावल्यानंतर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात सुरू होते.

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. यापूर्वी केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आश्वासने मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडतांना मान्यवर

वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू केले होते. त्यांनी देशभरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आंदोलन अहिंसक मार्गाने पुढे नेण्याची विनंती केली.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनाच्या आयोजकांनी स्पष्ट केले असून, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि परीक्षा गैरव्यवहारांवर ठोस कारवाईची मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Read More