सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.११ : गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेणे आता दिवसेंदिवस कठीण होत चालले असताना, विजेंद्र कळंबे यांनी नागपूर येथे लॉन्ग मार्च आयोजन करून शासना पर्यंत गोरगरिबांचा आवाज बुलंद केला.
मुलींना मोफत शिक्षण, मध्यान भोजन, आठव्या वर्गापर्यंत पुस्तके मोफत, अशा अनेक कल्याणकारी योजना शासनाने राबविल्या असून, पदवीचे शिक्षण स्वखर्चाने करावे लागत आहे, आज शिक्षणाचा खर्च महाग झाल्याने व गोरगरीब जनतेच्या खिशाला परवडणारा नसल्याने अनेक विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकत नाही, याची जाणीव कळंबे यांना झाल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कानापर्यंत आपला आवाज बुलंद करीत. शासनाने सर्वांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करावे म्हणून सोमल वाडा ते रिझर्व बँक चौकापर्यंत लॉंग मार्च काढून शासनाला आपल्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून कळविल्या. या लॉंग मार्चमध्ये अनेक विद्यार्थी व पालकांनी हजेरी लावून ही मागणी शासनाने मान्य करावी, व गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणावे, जर विद्यार्थी शिक्षित झाले तर राज्य प्रगत होईल व राज्य प्रगत झाले, तर देश बलवान होईल असा संदेश या प्रसंगी देण्यात आला.












