सक्षम भारत वार्ता
नागपूर ता.21 : दिव्याज फाउंडेशन व मुराका ग्रुप यांच्या समन्वयाने आशा व अंगणवाडी सेविकांसाठी ‘आर्थिक साक्षरता व महिला आरोग्य’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापक, गायिका, माजी बँकर व सामाजिक कार्यकर्त्या मा. श्रीमती अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आशा सेविकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच त्यांच्या आरोग्यविषयक गरजा व समस्यांबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांत अशा अनेक कार्यशाळांचे आयोजन करून सुमारे १,११२ आशा सेविकांपर्यंत पोहोचण्याचा दिव्याज फाउंडेशनचा मानस आहे. आजच्या कार्यशाळेत शहरातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुमारे ३०० आशा सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेते श्री. स्वप्नील जोशी, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद (IAS), वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, NSEIL चे उपाध्यक्ष श्री. जोगिंदर सिंह,मुराका ग्रुपचे संस्थापक श्री. शंकरजी मुराका, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर तसेच मनपाचे माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड,NUHM चे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार

















