सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त नागपूर महापालिकेत अभिवादन

सक्षम भारत वार्ता
नागपूर, दि. १८ जुलै : लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त नागपूर महानगर पालिकेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आपल्या साहित्य, लोककला आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आवाज देणाऱ्या डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. या अभिवादन कार्यक्रमाला दुर्बल घटक समितीच्या अध्यक्षा कु. लक्ष्मीताई हत्तीठेले, महेंद्र प्रधान, चंद्रकांतजी वानखेडे, रमेशजी पाडण, बंटीभाऊ इंगळे तसेच नागपूर महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या कार्यातून समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा आजही मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Read More